Earthquake in Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा पृथ्वी हादरली, भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

Earthquake in Delhi-NCR: राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. याशिवाय जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात भूकंपाच्या धक्क्यामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले.

देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात भूकंपाच्या धक्क्यामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील जर्मपासून 43 किमी दक्षिण-पश्चिमेस असल्याचे सांगण्यात येत आहे. रिअॅक्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.9 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही त्याचे धक्के जाणवले.

सोशल मीडियावरील काही लोकांनी दावा केला की, नवी दिल्लीसह अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारताच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचवेळी, वृत्तसंस्था रॉयटर्सने जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (जीएफझेड) चा हवाला देत सांगितले की, अफगाणिस्तानमधील हिंदूकुश भागात 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. जीएफझेडने सांगितले की, भूकंप 189 किमी खोलीवर होता.

 

नवीन वर्षात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी, दिल्ली-एनसीआरमधील लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात भूकंपाच्या धक्क्यांनी झाली. नवीन वर्षाच्या मध्यरात्री दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील झज्जर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

Aadhaar Update 2023: आधारमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी घरच्या प्रमुखाची संमती आवश्यक आहे.

शेयर करो:

Leave a Comment